पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मी सदैव मागे : महेंद्रशेठ घरत
उलवे, ता. ३१ जुलै २०२५ : "महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पोस्टल कामगार आलेत. मी १९८७ पासून कामगारांसाठी लढतोय. पोस्टल कर्मचारी, एसटी कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी राज्य आणि देशपातळीवर उत्तम सेवा देत आहेत, तिथे खासगीकरण योग्य नाही. त्यांनी खेड्यापाड्यात सेवा दिलीय. आयुष्यभर खस्ता खाल्ल्यात. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय कधीच सहन केला जाणार नाही. त्यामुळे पोस्टल कर्मचाऱ्यांच्या सदैव मी मागे आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत पेण येथे म्हणाले. पेण येथे 'नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन- एमटीएस'चे विचारमंथन सुरू आहे. तेथे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, "मानवतावाद महत्त्वाचा, म्हणून मी काॅंग्रेसमध्ये आहे. आता विचारांची लढाई राहिलेली नाही. अहंकार सोडा, शिवरायांनी कधीच जातपात पाहिली नाही, तो आदर्श सतत आपल्यात हवा. इंटकसाठी आपण काही ही करू." महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून पोस्टल कामगार उप...