जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.



दिनांक : १२ ऑगस्ट २०२५.
पनवेल प्रतिनिधी 
 
अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या सहकार्यासोबत दिनांक 10 ऑगष्ट रोजी रवाना झाले.
महादेवावर अपार श्रद्धा असलेले महेंद्रशेठ घरत ह्यांनी 2018 साली कैलाश यात्रा केली होती. त्यानंतर त्यांचे आयुष्यचं बदलून गेले, त्यांना यश व आर्थिक सुबत्ता मिळाली. त्यानंतर तर त्यांची देवावरची श्रद्धा अजून दृढ झाली व जे काही आपल्याला मिळालेय ते देवाचे देणे आहे आपण आपल्या गरजे पुरते ठेऊन गोरगरिबांना मदत, दानधर्म ते करत राहिले. त्यानंतर ते समाजात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले, आपल्या घरी आलेला एकही गरजू रिकाम्या हाती परत जाणार नाही याची काळजी ते घेऊ लागले.गरिबांच्या कल्याणासाठी देवाने आपल्याला अपेक्षेपेक्षा भरभरून दिल्याने महादेवाचे  आभार मानावे व त्यांच्या आशिर्वाद घ्यावा यासाठी ते  आपले सहकारी वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर व प्रित म्हात्रे यांच्यासह पुन्हा एकदा कैलाश यात्रेला रवाना झाले.

Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.