तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.
नवीमुंबई / प्रतिनिधी
नेरूळ नवी नवी मुंबई स्थित अहमदनगरची कन्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई हाडोळे यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस अण्णा हजारे यांनी सुवर्णाताईंना दिला कानमंत्र तु सत्याच्या मार्गाने चालली आहेस माझा तुला पुरेपूर आशीर्वाद व पाठिंबा आहे तू गेली 18 वर्ष समाजसेवेत माझ्यासारखे वाहून घेतले आहे, परंतु तू लहान संसार सांभाळता सांभाळता तू मोठाही संसार सांभाळते याचा मला खूप अभिमान वाटला तसेच तू शेकडो घर संसारातून उध्वस्त होणारे वाचवले व त्यांचे घर बसवण्याचे उत्कृष्ट काम करत आहे आज मुंबई, नवी मुंबई सारख्या ठिकाणी तू काम करतेस याचा अहमदनगर कर वासियांना व आम्हाला सार्थ अभिमान आहे तू सत्याच्या मार्गाने चालली आहेस तू खूप पुढे जाशील व एक ना एक दिवस तू तुझे नाव लौकिक करशील जनतेप्रती हाच माझा आशीर्वाद रुपी संदेश देतो आणि तुला पुढील जनतेप्रति तसेच समाजाप्रती काम करण्याची इच्छाशक्ती देवो असा आशीर्वाद देतो. - आण्णा हजारे.
Comments
Post a Comment