⛔ ४०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली निरोगी हृदयाची प्रतिज्ञा
⛔जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने जनजागृती उपक्रमाचे आयोजन*
दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
नवी मुंबई :
जागतिक हृदय दिनानिमित्त, मेडिकव्हर हॉस्पिटलने खारघर येथील वायएमटी कॉलेज आणि सीवूड्स येथील स्टर्लिंग कॉलेजमध्ये जनजागृती पर व्याख्यानांचे आयोजन केले होते. या उपक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी निरोगी हृदयाची प्रतिज्ञा घेतली. हृदय समस्या टाळा आणि निरोगी हृदयाची प्रतिज्ञा घ्या हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य होते. भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे आणि त्यातही तरुण रुग्णांची संख्या वाढत आहे. चूकीची जीवनशैली, वाढता तणाव , आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे ऱ्हदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहे.
हृदयविकाराचा झटका, ऱ्हदयाचे अनियमित ठोके आणि उच्च रक्तदाब यासारख्या हृदय समस्या आता केवळ वृद्धांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. सध्या तरुणांना हृदयविकाराचा झटका आणि सडन कार्डियाक अरेस्ट हार्ट फेल्युअर सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. छातीत दुखणे, दम लागणे, छातीत धडधडणे आणि थकवा यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान व उपचार केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो असे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. केशव काळे यांनी स्पष्ट केले.
*इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ऋषी भार्गव सांगतात की,* महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयाने हाती घेतलेला हा अनोखा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद होता. तज्ञांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणावाचे व्यवस्थापन आणि नियमित तपासणी यासारख्या जोखीम घटक तसेच लक्षणे व प्रतिबंधाबाबत खास टिप्स दिल्या.
मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल सांगतात की, जागरूकता ही प्रतिबंधाचे पहिले व महत्त्वाचे पाऊल आहे. आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणे म्हणजेच उद्याचे निरोगी कुटुंब निर्माण करणे होय.
सहभागी विद्यार्थीनी वर्षा सोनी सांगते की,* आम्ही मेडिकव्हर हॉस्पिटलचे आभारी आहोत की त्यांनी हा आरोग्यदायी उपक्रम राबविला. आम्ही अनेकदा ताणतणाव आणि वाईट सवयींकडे दुर्लक्ष करतो, परंतु आज आम्हाला समजले की ते भविष्यात किती धोकादायक ठरू शकते. याठिकाणी तज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक टिप्सचे आम्ही दैनंदिन जीवनात नक्कीच पालन करु आणि आमच्या हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ.
Comments
Post a Comment