⛔ नेरे सरपंच प्रकाश गोपाळ घाडगे यांच्या सरपंच पदाला स्थगिती...
⛔ ग्रामपंचायतीचे काम नियमाने व कायदेशीररित्या सुरू राहील... अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे आदेश....
दिनांक : १० ऑक्टोबर २०२५.
यूथ महाराष्ट्र / पनवेल
पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच प्रकाश गोपाळ घाडगे यांना जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ३०/२०२३, दि. ०९/०९/२०२५चे
आदेशास पुढील आदेशापर्यंत" स्थगिती" देण्यात आली आहे.
अर्जदाराचा दावा सिध्द करण्यासाठी ऍड. प्रल्हाद खोपकर आणि ऍड. सुरज रमेश म्हात्रे यांनी कायदेशीर बाजू मांडली. सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे प्रकाश गोपाळ घाडगे यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते. परंतु
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १६ (२) नुसार प्रकाश घाडगे यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, प्रकाश घाडगे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १६(२) अन्वये विवाद अर्ज दाखल केला होता. प्रकाश घाडगे हे दिनांक १८/१२/२०२२ च्या निवडणूकीमधून सरपंच पदावर निवडूण आलेले आहेत. प्रकाश घाडगे यांचे विरुध्दची अतिक्रमणाची तक्रार ही खोटी असून, गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी स्वतंत्र अहवाल दाखल केले आहेत. प्रकाश घाडगे यांनी ज्या घराचे बांधकाम अतिक्रमणात केलेले आहे, असे दर्शविले आहे. सदरहू घर प्रकाश घाडगे यांच्या आईचे आजोबा कै. गोविंद बाळू बामूगडे यांनी सन १९६१ पूर्वी बांधलेले आहे. ज्या मिळकतीवर हे घर आहे ती मिळकत वन खात्याची आहे ही शासकीय मोजणी झालेली नसल्याने, घराची जागा अतिक्रमणात हे स्पष्ट होत नाहीत. जिल्हाधिकारी रायगड यांनी प्रकाश घाडगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत सविस्तर चौकशी न करताच, यांचे सरपंच पद रद्द केलेले आहे. हा प्रकाश घाडगे यांचेवर अन्यायकारक असून, प्रकाश घाडगे हे लोकशाही मार्गाने सरपंच पदावर निवडूण आलेले आहेत. प्रकाश घाडगे यांनी त्यांच्या अपील अर्जात नमूद केलेले मुद्दे विचारात घेता, प्रकाश घाडगे यांचा अर्ज मान्य करुन, शंकर गोपाळ ठाकूर यांनी पूर्वग्रह दूषित भावनेने केलेला अर्ज अमान्य करुन, प्रकाश गोपाळ घाडगे यांचे सरपंच पद नेहमीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांचे दिनांक ०९/०९/२०२५ रोजीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे शंकर ठाकूर यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच ग्रामपंचायतीचे काम नियमाने व कायदेशीररित्या सुरु राहील. तरी आव्हानित आदेशास स्थगिती देण्याची विनंती प्रकाश घाडगे यांच्या वकीलांनी केलेली होती.
प्रकाश घाडगे व शंकर ठाकूर यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद, आव्हानित आदेश व उपलब्ध कागदपत्र यांचे अवलोकन करता, नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता, कोकण विभाग अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या आदेशात प्रकाश घाडगे व शंकर ठाकूर यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद, नमूद विवेचन व अपीलार्थी यांनी युक्तीवादात मांडलेले मुद्दे याची सविस्तर तपासणी होणे आवश्यक असल्याने प्रकरण गुणवत्तेवर अंतीम करणेसाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे आव्हानित आदेशास पुढील आदेशापर्यंत "स्थगिती"
जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ३०/२०२३, दि. ०९/०९/२०२५चे
Comments
Post a Comment