जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सीकेटी कॉलेजमध्ये इमोशन फ्रेडली कॅम्पस डे साजरा.
दिनांक : ११ ऑक्टोबर २०२५.
पनवेल (प्रतिनिधी)
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) अर्थात सीकेटी कॉलेजमध्ये युवा मानसरंग क्लबच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त 'इमोशन फ्रेडली कॅम्पस डे' हा कार्यक्रम पार पडला.
प्रो. सोनाली हुद्दार यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करत मुख्य प्रवक्ते प्रो. डॉ. बी.एस.पाटील व समुपदेशन विभागाच्या प्रमुख स्वाती परब यांच्या स्वागताने सुरुवात झाली. मानसरंग संवादक, पूर्वा, संस्कृती, समिक्षा, सृष्टी यांनी पुढील जबाबदारी पार पडली. या सत्राची सुरवात डॉ.बी.एस.पाटील यांनी ‘भावना आणि मानवी वर्तन’ या विषयाने केली. यामध्ये स्वतःला ओळखायला शिकणे का महत्वाचे आहे. तसेच आपण भावनांचे नियंत्रण कसे करायचे हे उदाहरणांद्वारे सांगितले. तसेच मनाची क्षमता हि अगाध आहे आणि त्याला कसे ओळखायचे हे प्रात्याक्षिके घेऊन पटवून दिले. यंदाचे जागतिक मानसिक आरोग्याची थीम ‘आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश ‘हे असून, मुलांना आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही सेवांचा वापर करणे का गरजेचे आहे कारण प्रत्येक कठीण परिस्थिती ला एक चंदेरी झालर असतेच आणि ती शोधण्यासाठी समुपदेशक आणि मानसरंग संवादक हे एमएसएफडीए आणि परिवर्तन ट्रस्ट द्वारे प्रशिक्षित युवा मानसरंग क्लब ह्या फोरम द्वारे मदत करण्यास तयार असतात हा संदेश मुलांपर्यंत पोहोचवला. कार्यक्रम झाल्यावर एक ऑनलाईन व्यक्तिमत्व चाचणी सुद्धा घेण्यात आली. त्याचा रिपोर्ट लगेचच विद्यार्थ्यांच्या ईमेल आईडी वर पाठवण्यात आला, जेणेकरून त्याची गुप्तता पाळली जाईल. या कार्यक्रमासाठी प्रो.डॉ.भाग्यश्री भोईर, प्रज्योती देसाई, प्रो. सोनाली हुद्दार, प्रो. दीपश्री राठोड, व १८७ विद्यार्थी, यांनी सहभाग घेतला होता.
Comments
Post a Comment