⛔ १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५.
यूथ महाराष्ट्र / प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कलिना येथे महाबोधी महाविहारासंबंधी आंदोलनासाठी चर्चा करण्यासाठी संपन्न झाली. या बैठकीला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख सागर भाई संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित होते. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा आझाद मैदान येथे महाबोधी महाविहार यांविषयी चर्चा करण्याकरता आयोजित केलेला आहे . रायगड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येने 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे उपस्थित रहावे असे आवाहन महेश साळुंखे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment