⛔ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सवात पैठणीचा खेळ रंगला!




⛔ १६ हजारांची पैठणी जिंकल्याने विजेत्या स्पर्धकांचा चेहरा फुलला!

उलवे, दिनांक : १ ऑक्टोबर  २०२५ : 

उलवे नोडमधील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सवात मंगळवारी पैठणीचा खेळ रंगला. यावेळी सुमारे २०० महिलांनी खेळ पैठणीचा आनंद लुटला.
यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था शेलघर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटीने शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या नवरात्रोत्सवात खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला. शुभांगीताई घरत आणि महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला नवरात्रोत्सव उलवे नोडमध्ये सुप्रसिद्ध आहे. पहिल्या क्रमांकाला स्कूटी आणि इतर विविध बक्षिसांची लयलूट दांडिया खेळायला येणाऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे दांडिया खेळायला येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रोत्सव सुरू आहे.
कुणाल घरत, उरण विधानसभा युवक अध्यक्ष रोहित घरत आणि वैभव पाटील यांनी नवरात्रोत्सवाची धुरा सांभाळली आहे. 
दरम्यान,  महिलांच्या सन्मानासाठी आणि आनंदासाठी 'खेळ पैठणीचा' आयोजित करून नवरोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
होम मिनिस्टरमध्ये स्वाती भगत (चिरनेर) प्रथम क्रमांक, मीनाक्षी घरत (शेलघर) द्वितीय तर आरती नवाल (उलवे) या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. त्यांना प्रत्येकी १६ हजारांची भरजरी पैठणी बक्षीस म्हणून शुभांगीताईंच्या हस्ते देण्यात आली. 
दांडियात सहभागी झालेल्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पेशवाई पैठणीची लॉटरी लागली. माधुरी गवळी, मंजुळा घरत, माया कोळी, अनिता पुरोहित आणि प्रतिभा भगत यांना पैठणीची लॉटरी लागली. उत्कृष्ट निवेदक नितेश पंडित, पपन पाटील आणि निवेदक मनीष पाटील यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध खेळांद्वारे महिलांना हसतखेळत ठेवले. 
महेंद्रशेठ घरत आणि सौभाग्यवती शुभांगीताई घरत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीकांत घरत, वैभव पाटील आणि एमजी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.