⛔ खोपोली नगरपरिषद प्रभाग क्रमांक दहा मधून आम आदमी क्रांती घडविणार
⛔ डॉ. रियाज पठाण प्रभाग क्रमांक दहा क सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढणार
दिनांक : ८ ऑक्टोबर २०२५.
यूथ महाराष्ट्र / प्रतिनिधी
खोपोली शहरात आम आदमी पार्टी मागील काही वर्षांपासून उत्कृष्ट असे कार्य करत असून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अशातच आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले असून खोपोली शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा क ही जागा सर्वसाधारण जाहीर झाली आहे. सदर जागेवरून आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण हे नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढणार आहे.
प्रस्थापित राजकारण बदलण्याकरिता व व्यवस्था परिवर्तन करण्याकरिता आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत असून नागरिकांनी तात्पुरते आर्थिक फायदे न घेता पाच वर्षाकरिता तुमच्या हक्काचा, मजबूत उमेदवार जो खरोखरच आपल्या वार्डामध्ये बदल घडवण्याचा दमखम ठेवतो त्यालाच विजयी करा असे डॉक्टर पठाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
निवडणूक म्हटली तर पैशांचा खेळ, तो खेळ थांबवण्यासाठीच आम आदमी पार्टी आगामी निवडणुकीत मैदानात उतरणार आहे असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.
Comments
Post a Comment