⛔ दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!



उलवे, दिनांक . :  ३ ऑक्टोबर २०२५.

दसरा म्हणजेच विजयादशमी! हा वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून गणला जाणारा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजला जातो. अशा या दसऱ्याला पनवेल तालुक्यातील शेलघर गावात सोने लुटण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांची आहे. १९२५ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शेलघरमध्ये उत्साहात दसरा साजरा करण्याची परंपरा नारायण देहू घरत यांनी सुरू केली. त्यांना त्याकाळी गांधीबाबा संबोधले जात असे,  ग्रामस्थ सांगतात. आत्माराम भगत, वाळकू भगत, वामन भगत, गणपत भगत हिरीरीने सहभागी होत. तीच परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पाचवी पिढी दसरा साजरा करत आहे. एकेकाळी जंगलात असणाऱ्या शेलघर गावात पूर्वी शमीच्या (आपटा) वृक्षाखाली गावातील सर्व मंडळी एकत्र जमून सोने लुटत असत. आपल्यातील वैरभाव विसरून गुण्यागोविंदाने एक दुसऱ्याला शमीची (आपटा) पाने देऊन दसरा साजरा करत असत. त्यानंतर दसऱ्याची हीच परंपरा दिवंगत जनार्दन आत्माराम भगत, विठ्ठल गणपत भगत, तुकाराम नारायण घरत, काशिनाथ त्रिंबक भगत, जगन्नाथ वामन भगत, सुदाम कान्हा भगत यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामस्थ एकत्र जमत असत आणि दसरा साजरा करीत. आज आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, अरुणशेठ भगत, अमृत भगत, रमेश घरत, गुलाब घरत, मधुकर म्हात्रे, श्रीकांत घरत, रतनशेठ भगत आदी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली शेलघरमधील तरुण पिढी एकत्र आली आणि गुरुवारी दसऱ्याला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शमीच्या झाडाची पूजा केली आणि एकमेकांना शमीची पाने देऊन उत्साहाने दसरा साजरा केला, तेव्हा ग्रामस्थांच्या आनंदाला उत्साहाचे भरते आले होते. जणू श्रीरामांनी रावणाचा आजच वध केला आहे. 
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत बहुतांश वेळा कामाच्या निमित्ताने जगभ्रमंती करीत असताना कितीही व्यस्त असले तरी प्रत्येक सणवार ग्रामस्थांसोबत साजरा करण्याची पद्धत त्यांनी आजही जोपसली आहे. आपले पाय जमिनीवर आहेत, हे त्यांच्या कृतीतून ते दाखवतात. ते एकेकाळी मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने नाईलाजास्तव पनवेलला राहयचे; परंतु आपली गावापासून असलेली नाळ तुटू नये म्हणूनच गेल्या २० वर्षांपासून पुन्हा आपल्या शेलघर येथील 'सुखकर्ता' या निवासस्थानी राहातात. जेणेकरून गावातील सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वांना अडीअडचणीत साथ देता येईल. त्यामुळेच दसऱ्याची शंभर वर्षांची परंपरा जपण्यासाठी त्यांनी  उत्साहाने ग्रामस्थांसोबत गुरुवारी दसरा साजरा केला.


Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.