सीकेटी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने उमरोली येथे भव्य वृक्षारोपण.


यूथ महाराष्ट्र 
पनवेल (प्रतिनिधी) 
दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५.

 माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (अधिकारप्रदत्त स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उमरोली येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासमयी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, स्वयंसेवक आदींची उपस्थिती लाभली.   

            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सूरु केलेल्या एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या निर्देशानुसार सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे “एक स्वयंसेवक एक झाड” या विस्तार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमदिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तथा कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या चमुने सकाळी ०८.३० वाजता उपक्रमस्थळाकरीता महाविद्यालयातुन प्रस्थान केले. सदर चमूचे ग्रामपंचायत उमरोलीचे सदस्यगण आणि कर्मचाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीच्या सरपंच  बेबी कचींद्र ठाकूर व उपसरपंच किरण डांगरकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्वेता हनुमान माळी, शुभांगी नरेश मढवी, उमरोली ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य, जय हनुमान क्रिकेट संघ उमरोलीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित विद्यार्थी, स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांनी वेगवेगळ्या प्रकाराच्या एकूण ३०० रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.       

         वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. संजय पाटील व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक  प्रो. (डॉ.) बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अध्यक्ष डॉ.  राजेश येवले, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. आलोक भानुशाली, प्रा. सुशिलकुमार घाडगे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भोईर, एन.एस.एस. अभ्यासक्रम समन्वयक प्रा. रुपेश माने, श्री. मिलिंद पाटील आणि सर्व  स्वयंसेवक-स्वयंसेविका  यांनी रिश्रमपूर्वक सहभाग घेतला.

 


Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.