विश्वास पाटील यांच्या शब्दरुपी पाठपुराव्याला मिळालं यश शिवणसई रा.जि.प. शाळेला मिळाले दोन संगणक ( कंप्युटर ) आणि दोन प्रिंटर भेट !!
दिनांक : ३ ऑक्टोबर २०२५.
पनवेल / प्रतिनिधी.
सामाजिक भान...आणि...कर्तव्याची जाण ...असणारं आणि...आपल्या समाजाभिमुख कार्याने...पनवेल तालुक्यातील नेरे - दुंदरे विभाग आणि आजूबाजूच्या परिसरात सतत चर्चेत असणारं आणि सदैव सर्वांच्या मदतीला धावून जाणारं परोपकारी गुणांचं व्यक्तिमत्त्व...दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे पनवेल उपतालुका प्रमुख... विश्वासदादा पाटील साहेब सतत जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या ह्या जनसेवकाने आपल्या परीने जे जे काही चांगलं काम करता येईल ते ते काम करत रहावं याच उदात्त भावनेतून...गेले अनेक दिवस..मुंबई - दादर येथील...कीर्ती महाविद्यालय दादर - मुंबई आणि महाविद्यालयाचे ...रासायन शास्त्र विभागाचे दत्तात्रेय पाटील सर यांच्या कडे केलेल्या विनंतीपर मागणीला यश आलं...आणि... एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं....ते म्हणजे...डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कीर्ती महाविद्यालय दादर- मुंबई यांच्यामाध्यमातून...पनवेल तालुक्यातील...शिवणसई रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेला २ ( दोन )...कंप्युटर ( संगणक ) भेट म्हणुन देण्यात आले...तर...कीर्ती महाविद्यालयाचे...रासायन शास्त्र विभागाचे प्रमुख... दत्तात्रेयजी पाटील सर यांच्या दातृत भावनेच्या औदार्यातून...२ ( दोन ) प्रिंटर... भेट स्वरुपात देण्यात आले.
दानत परिमितेचा नवीन अध्याय निर्माण करणार्या ...कीर्ती महाविद्यालय दादर- मुंबई...आणि...*मा.डॉ.श्री. दत्तात्रेय जी पाटील सर* यांच्या औदार्यातून... शिवणसई रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळालेल्या ह्या अनमोल भेटीने अर्थात...२ ( दोन)...कंप्युटर ( संगणक )..आणि... २ ( दोन ) ...प्रिंटर प्रगत तंत्रज्ञानच्या युगात लॅपटॉप कंप्युटर ईत्यादीच्या रूपाने शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्य शिकण्याकरिता आणि भविष्यात त्यांच्या करिअरसाठी योग्य ज्ञान आणि कौशल्य मिळावं या करिता पेन आणि कागदाच्या विपरीत संगणक ( कंप्युटर ) आत्ता खूप सामान्य झालं आहे...आणि म्हणुनच विद्यार्थ्यांना केवळ शाब्दिक ज्ञानापुरते टिकून न राहता दररोज नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे आणि हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन आपल्या माध्यामातून समाजात तंत्र ज्ञानाची आवड निर्माण करणारं महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेलं ... कीर्ती महाविद्यालय दादर - मुंबई यांच्या ह्या औदार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
सामाजिक कार्यकर्ते...आणि...ग्रामपंचायत दुंदरेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील यांनी कीर्ती महाविद्यालयाच्या कडे केलेली विनंतीपर मागणी आणि त्यासाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे त्यांच्या शब्दाला मान देत त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत कीर्ती महाविद्यालय दादर मुंबई* यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यां करिता मिळालेली ही अभूतपूर्व भेट विश्वासदादा पाटील यांच्या शब्दाच मान वाढवतोय एवढं मात्र नक्की !
" एक पाउल गावाच्या विकासासाठी "हेच ध्येय उराशी बाळगून ग्रामपंचायत सदस्य विश्वासदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या ह्या कार्यक्रमा करिता खास उपस्थिती लाभली ती... डेक्कन एज्युकेशन सोसायटी च्या कीर्ती महाविद्यालय दादर पाश्चिम मुंबईचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ अनिल मार्कंडेय सर, दत्तात्रेय पाटील सर, प्राध्यापक अंकुशजी दळवी सर( एन. एस. एस. प्रोग्राम ऑफिसर ), मंदारजी खानविलकर ( एन.एस.एस. स्वयंसेवक ), नभेशजी पांचाळ ( एन एस. एस. स्वयंसेवक निमेषजी कुंडे ( एन. एस. एस. स्वयंसेवक ) कार्यक्रमाचे आयोजक दुंदरे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख विश्वासदादा पाटील व रायगड जिल्हा परिषद शाळा शिवणसई शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाजी नाईकवडे मॅडम, सौ. सुवर्णाजी कांबळे मॅडम, सौ.उज्ज्वला ताई पाटील आणि शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थीवर्ग ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Comments
Post a Comment