महेंद्रशेठ घरत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना.




उलवे, दिनांक :. ६ ऑक्टोबर २०२५  : 

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ३ ते ९ ऑक्टोबर असा भरगच्च कार्यक्रमांचा त्यांचा दौरा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. यावेळी विधानसभा प्रभारी जातीने हजर आहेत.
कर्जत, खालापूर, खोपोली, उरण, पनवेल येथील तालुकानिहाय विधानसभा आढावा बैठका पार पडलेल्या आहेत. त्या बैठकांत कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या बैठकांना काँग्रेसने नियुक्त केलेले विधानसभा प्रभारीही उपस्थित असतात. 
मंगळवारी महेंद्रशेठ घरत पेण तालुक्यातील आढावा बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर तेथून ते बुधवारी (ता. ८) सकाळी अकरा वाजता रोहा येथे बैठक घेतील. दुपारी १.०० वाजता तळा, २ वाजता माणगाव, ५ वाजता महाड येथील बैठकांना ते उपस्थित राहतील. तळा, माणगाव, महाड येथे नूतन कार्यालयांचे उद्घाटन ते करतील. त्यानंतर ते गुरुवारी (ता. ९) श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, मुरूड तालुक्यांच्या आढावा बैठका घेतील.
यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, युवक अध्यक्ष निखिल ढवळे, फिशरमनचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, ओबीसी सेलचे उमेश भोईर, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अखलाख शिलोत्री, पर्यावरण विभागाचे राजू पाटील, वैभव पाटील, किरीट पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखाताई घरत आणि रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारीही आहेत.

चौकट...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे आहे. त्यांच्यातील उत्साह वाढवणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांची मते सध्या जाणून घेत आहे. 
-महेंद्रशेठ घरत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष.

Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.