⛔ पाली देवद सुकापूरच्या सरपंच पदी ज्योती केणी बिनविरोध ...
⛔ पाली देवद सुकापूरला मिळाला नवा सरपंच..
ज्योती केणी यांची बिनविरोध निवड ...
दिनांक : ९ ऑक्टोबर २०२५
यूथ महाराष्ट्र / प्रतिनिधी
ग्रामपंचायत पाली देवद सुकापूरच्या सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पाली देवद सुकापूरच्या सरपंच पदी ज्योती रवींद्र केणी यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. सरपंच पदी ज्योती रवींद्र केणी यांची निवड झाल्यानंतर त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना अनेकांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर ज्योती केणी यांनी आभार देखील व्यक्त केले.
ज्योती केणी यांची सरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांचे गावांमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावातल्या नागरिकांनी पुष्पहार घालून त्याचबरोबर आरती ओवाळत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत दादा ठाकूर, अरुणशेठ भगत साहेब यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर मार्गदर्शनाखाली ही बिनविरोध निवडणूक जिंकल्याबद्दल ज्योती केणी यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर अशोक शेठ पाटील, पांडू शेट केणी, आत्माराम पाटील, संजय पाटील, चेतन केणी, प्रमोद भगत, बाबुराव पोपेट, विकास तलेकर,पूनम भगत,आतिश पाटील, संदीप पाटील सह समस्त ग्रामस्थांनचे देखील आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment