⛔ महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन कृती समीतीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस उपायुक्तांची भेट.


⛔ येत्या 14 ऑक्टोबर रोजी जिजामाता उद्यान ऐवजी मेट्रो टॉकीज ते आझाद मैदान असा निघणार बौध्द जनतेचा विराट मोर्चा


 
मुंबई दिनांक - ८ ऑक्टोबर २०२५  -  

बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी  येत्या 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने सर्व बौध्द जनतेच्या  एकजुटीचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.या मोर्चाच्या मार्गास भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशी परवानगी देण्यात यावी यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त डॉ.प्रविण मुंडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत जिजामाता  उद्यान ते आझाद मैदान या मार्गाने मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नसल्याचे सांगत स्पष्ट शब्दात पोलिस उपायुक्त डॉ.प्रविण मुंडे यांनी जिजामाता उद्यान येथून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली जीजामता उदयान ते आझाद मैदान ऐवजी अन्य पर्याय म्हणुन मेट्रो टॉकीज ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग ठरविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.मेट्रो टॉकीज ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग ठरवीण्याबाबत मोर्चाचे शिष्टमंडळ,पोलिस आणि वाहतुक पोलिसांच्या सोबत संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.अशी माहिती महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितिच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी दिली आहे. 
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त डॉ.प्रविण मुंडे यांची मोर्चाच्या परवानगीसाठी भेट घेतली.त्या शिष्टमंडळात रिपाइं (आठवले) राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे,मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,रिपब्लिकन डेमोक्रॅटिक चे दिलिपदादा जगताप,रिपाइं खोबरागडे गटाचे सुनिलभाऊ निर्भवणे,पिपल्स रिपब्लिकन चे मिलिंद सुर्वे,युथ रिपब्लिकन चे सागर संसारे,धम्म सेवक घनश्याम चिरणकर,जिल्हाध्यक्ष संजय पवार,प्रकाश जाधव,शिरीष चिखलकर,प्रमोद काकडे, ऍड.बि.के बर्वे, भिमदास जाधव आदी मान्यंवरांचा समावेश होता. 



              
        

Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.