⛔ चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
दिनांक : ८ ऑक्टोबर २०२५
पनवेल / प्रतिनिधी
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा बुधवार दिनांक ८ मार्च २०२५ ते १६ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर मुंबई शहर झोन-१ डॉ.मनोज वर्मा , मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सह-सचिव मा. पूनम मुजावर यांची उपस्थिती लाभली.
तसेच स्पर्धेमध्ये ५१ महाविद्यालयातील मुलांच्या संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment